1 Chronicles 11:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्‍यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले.