1 Chronicles 11:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिंमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले.