1 Chronicles 11:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.”