1 Chronicles 12:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अमासय हा तीस वीरांचा सरदार होता. त्याच्यात परमेश्वरी आत्म्याचा साक्षात्कार झाला आणि तो म्हणाला, “दावीदा, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत शांती असो! तुला साहाय्य करणाऱ्यांनाही शांती असो. कारण देव तुझा पाठीराखा आहे.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमासय याच्यावर आत्मा आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.