1 Chronicles 12:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे सर्व जण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदाला सर्व इस्राएलाचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खर्या मनाने आले; दाविदाला राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व योद्धे, जे सेनेत त्यांच्या हुद्यानुसार सहभागी होण्यास स्वेच्छेने आले. ते हेब्रोनला आले तेव्हा दावीदाला इस्राएलचा राजा करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. वास्तविक पाहता सर्व इस्राएलींनी या गोष्टीस मान्यता दिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.