1 Chronicles 12:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल वापरणे, भालाफेक यात ते वाकबगार होते. ते सिंहासारखे उग्र आणि डोंगरातल्या हरणासारखे चपळ होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.