1 Chronicles 13:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
किर्याथ-यारीम म्हणजेच यहूदातील बाला येथे दावीदासह सर्व इस्राएली पोचले. करारकोश म्हणजे करुबांवरती राहणाऱ्या परमेश्वराचा करार कोश. तो आणावा म्हणून ते आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
करूबारूढ असलेल्या परमेश्वर देवाच्या नामाचा कोश आणावा म्हणून दावीद व सर्व इस्राएल यहूदातले बाला उर्फ किर्याथ-यारीम येथे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे करुबांमध्ये आरूढ असलेला, जो त्या नावाने संबोधित केला जातो, तो याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी निघाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.