1 Chronicles 13:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
किदोनच्या खळ्यापर्यंत ते पोचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल जरा अडखळले. त्यामुळे करारकोश अगदी पडायला आला. तेवढ्यात उज्जाने कोशाला हात दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते कीदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.