1 Chronicles 14:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद देवाला म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी प्रतिहल्ला करु काय? मला तू त्यांचा पराभव करु देशील काय?” परमेश्वराने दावीदाला सांगितले, “जरुर जा. मी तुझ्या हातून पलिष्ट्यांचा पराभव करवीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने देवाला प्रश्न केला की, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर, मी त्यांना तुझ्या हाती देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्यास सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन.”