1 Chronicles 14:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिथे तुला सैन्य चाल करुन जात आहे याची चाहूल लागेल. तेव्हा पलिष्ट्यांवर हल्ला चढव. मी (म्हणजे देव) पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे होईन आणि त्यांचा पराभव करीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच युद्धासाठी पुढे चालू लाग, कारण पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी देव तुझ्या अग्रभागी गेला आहे असे समज.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”