1 Chronicles 14:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाला इस्राएलचा राजा केले आहे हे पलिष्ट्यांना कळले तेव्हा ते दावीदाच्या मागावर निघाले. दावीदाला ही बातमी कळली तेव्हा तो पलिष्ट्यांशी लढायला निघाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी त्याच्या शोधास निघाले; हे ऐकून त्यांच्याशी सामना करायला दावीद निघाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.