1 Chronicles 15:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आणि सर्व लेवींनी शुचिर्भूत झाले पाहिजे. त्यानंतर मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो करारकोश आणा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी वंशातील कुटुंबप्रमुख आहात; आता तुमच्या सर्व बांधवांसमवेत तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएली लोकांच्या याहवेह परमेश्वराचा कोश मी तयार केलेल्या जागेवरील नव्या तंबूत आणावयाचा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.