1 Chronicles 15:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह आपले परमेश्वर आपल्यावर पूर्वी क्रोधाविष्ट झाले, कारण तुम्ही लेवी लोकांनी तो उचलून आणला नाही. नेमून दिलेल्या विधीनुसार आपण कोश कोणत्या पद्धतीने उचलावयाचा यासंबंधी कधी चौकशी केली नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”