1 Chronicles 15:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदा, इस्राएलमधील वडीलधारी मंडळी, सरदार करार कोश ओबेद-अदोमच्या घरातून आणयया पुढे गेले. सर्वजण अत्यंत आनंदात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद, इस्राएलाचे वडील जन व सहस्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून दावीद, इस्राएलचे वडीलजन, सैन्याचे उच्चाधिकारी याहवेहच्या कराराचा कोश यरुशलेममध्ये आणण्यासाठी मोठ्या हर्षाने ओबेद-एदोमच्या घरी गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.