1 Chronicles 15:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद, कराराचा कोश वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या ह्या सर्वांनी तलम सणाचे झगे परिधान केले होते; दाविदाने तागाचे एफोद घातले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.