1 Chronicles 16:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते. त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत. सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.