1 Chronicles 16:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवाचाकरी करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा गुणानुवाद व उपकारस्मरण करण्यास काही लेवी नेमले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्‍या काही लेवी लोकांची नेमणूक केली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले.