1 Chronicles 16:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दररोज सकाळी आणि संध्याकाळी सादोक आणि इतर याजक होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर होमार्पणे करत असत. परमेश्वराने इस्राएलला जे नियमशास्त्र दिले होते त्यातील नियमांचे पालन करण्यासाठी ते असे करत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी नित्य सकाळ-संध्याकाळ होमवेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होम अर्पावेत. अर्थात परमेश्वराने इस्राएलास विहित केलेल्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्या सर्वांप्रमाणे त्यांनी करावे अशी व्यवस्था केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.