1 Chronicles 17:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी काही तापदायक गोष्टी घडल्या, पण मी माझ्या झस्राएल लोकांच्या रक्षणासाठी पुढारी नेमले होते. आता मी सर्व शत्रूंचा बीमोड करीन. “मी सांगतो की परमेश्वर तुझे घराणे चिरस्थायी करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून दुर्जन जसे त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड केला आहे. मी तुला म्हणत आहे की, परमेश्वर तुझे घराणे कायमचे स्थापील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून असेच घडले. मी तुझ्या सर्व शत्रूंचा ताबा घेईन. “ ‘मी असे जाहीर करतो की याहवेह तुझ्यासाठी एक घर बांधतील:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.