1 Chronicles 17:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्यावरचा विश्वास सार्थ ठरो. तुझ्या नावाबद्दल लोकांना आदर राहो. म्हणजे मग लोक म्हणतील, ‘सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव आहे.’ मी तुझा सेवक आहे. माझा वंश वाढून तुझ्या सेवेत मग्न असो : हे माझे मागणे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे, तो इस्राएलाप्रीत्यर्थ देव आहे, आणि तुझा सेवक दावीद ह्याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित आहे,’ असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाची स्थापना करून त्याचा निरंतर महिमा वाढवावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.