1 Chronicles 17:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“देवा, तू आपल्या सेवकाशी हे बोललास. माझे घराणे हे राजघराणे ठरेल असे तू स्पष्ट केलेस. त्यामुळेच धीर येऊन मी हे मागणे मागत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण, हे माझ्या देवा, तू आपल्या सेवकाला कळवले आहेस की मी तुझे घराणे स्थापीन,1 म्हणून तुला विनंती करण्याची हिंमत तुझ्या सेवकाला आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.