1 Chronicles 18:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा दावीदाने त्या वस्तू शुध्दीकरण करुन परमेश्वराला अर्पण केल्या. अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी लोकांकडून आलेल्या वस्तूही त्याने अशाच परमेश्वराला वाहिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून आणलेल्या सोन्याचांदीबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पण केली. अदोमी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी ह्या सर्वांपासून ही लूट आणली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.