1 Chronicles 18:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हदरेजरच्या सैन्याशीही दावीद लढला. हदरेजर हा सोबचा राजा. दावीदाने त्या सैन्याशी हमाथ नगरापर्यंत दोन हात केले. हदरेजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत वाढवू पाहात होता म्हणून दावीदाने हे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.