1 Chronicles 19:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. त्याच्या नायकत्वाखाली ते आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामी लोकांनी इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यांस आणले; हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोफख ह्याच्या नायकत्वाखाली ते आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा त्यांनी दूत पाठवून फरात नदीच्या पूर्वेकडून अधिक अरामी सैन्य बोलाविले. हादादेजर राजाचा सेनापती शोफख या सेनेचे नेतृत्व करीत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांस बोलवून घेतले. शोफख हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता.