1 Chronicles 19:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन आराम्यांच्या समोर व्यूह रचला. सर्व तयारीनिशी त्यांनी आरम्यांवर हल्ला केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे कोणी दाविदाला सांगितले तेव्हा त्याने अवघा इस्राएल एकत्र जमवून व यार्देनेपलीकडे जाऊन त्यांच्यावर चढाई केली आणि सैन्यव्यूह रचला; दाविदाने अराम्यांविरुद्ध व्यूह रचल्यावर ते त्यांच्याशी लढू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.