1 Chronicles 19:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाचे सेवक या गोष्टींमुळे इतके शरमिंदे झाले की त्यांच्याने घरी जाववेना. लोकांकडून दावीदाला ही बातमी समजली तेव्हा दावीदाने त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीही येथे रहा मग इकडे या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या लोकांना कशी वागणूक मिळाली हे कोणी जाऊन दाविदाला सांगितले. हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घेण्यास माणसे पाठवली; कारण त्यांना मोठी लाज वाटत होती. राजाने त्यांना सांगून पाठवले की, “तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा, मग इकडे या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा कोणी येऊन दावीदाला त्या माणसांबद्दल सांगितले, तेव्हा दावीदाने त्यांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग कोणी जाऊन दावीदाला ही बातमी सांगितली, तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या मनुष्यांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे रहा मग इकडे या.