1 Chronicles 19:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि दावीदाचे वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा हानून व अम्मोनी लोक ह्यांनी मेसोपटेम्या, अराम-माका व सोबा येथून रथ व घोडेस्वार आणण्यासाठी एक हजार किक्कार1 रुपे पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार रुपे पाठवले.