1 Chronicles 2:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ - शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचे पुत्र हे: एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.