1 Chronicles 20:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. सिप्पय हा अत्यंत धिप्पाड व रेफाई वंशातला होता. तेव्हा हे पलिष्टि लोक इस्राएलींना शरण आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टी लोक त्यांना शरण आले.