1 Chronicles 20:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गथ येथे पलिष्ट्यांशी इस्राएल लोकांची आणखी एकदा लढाई झाली. या गावात तेव्हा एक प्रंचंड आकारमानाचा माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तो राक्षसपुत्रच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा-सहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी गथ येथे झालेल्या दुसर्या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता.