1 Chronicles 21:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेवराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले त्या वेळी” परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाने यरुशलेमाचा नाश करायला एक देवदूत पाठवला; तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले तेव्हा ह्या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणार्या देवदूताला तो म्हणाला, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान1 यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ उभा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता.