1 Chronicles 21:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळून पाहतो तर त्याला देवदूत दिसला. अर्णानचे चारही मुलगे त्याला पाहून लपून बसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्णान मागे वळून पाहतो तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे चार पुत्र लपून राहिले. ह्या वेळी अर्णान गव्हाची मळणी करत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.