1 Chronicles 21:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अर्णान दावीद राजाला म्हणाला, “हे खळे मी तुम्हाला दिले. तुम्ही आमचे स्वामी आणि पोशिंदे आहात. तुम्ही त्याचे हवे ते करा. यज्ञात अर्पण करण्यासाठी मी बैलही देईन. तसेच वेदीवरील होमात घालण्यासाठी लाकडी फळ्या, आणि धन्यार्पणासाठी गहू हे ही सर्व मी तुम्हाला देईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्णान दाविदाला म्हणाला, “ही जमीन आपणाला घ्या, माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पाहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची औते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”