1 Chronicles 22:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. घाबरु नको. दृढ राहा. हिंमत बाळग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने मोशेला इस्राएलासंबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळशील तर तू कृतार्थ होशील; दृढ हो, हिंमत धर, भिऊ नकोस, कचरू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांचे तू काळजीपूर्वक पालन करशील, तर तू यशस्वी होशील. बलवान हो, धैर्यवान हो. भयभीत आणि निराश होऊ नको.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा नाउमेद होऊ नको.