1 Chronicles 22:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वर देवच तुमच्याबरोबर आहे. त्याच्या कृपेने तुम्हाला शांतता लाभली आहे. आपल्या भोवतालच्या शत्रूंना पराभूत करण्यात परमेश्वराने मला साहाय्य केले. आता हा देश परमेश्वराच्या आणि तुमच्या ताब्यात आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, नाही काय? त्याने तुम्हांला चोहोकडे शांतता दिली आहे ना? त्याने देशोदेशीचे लोक माझ्या हाती दिले आहेत आणि देश परमेश्वराच्या व त्याच्या लोकांच्या ताब्यात आला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हास शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे.