1 Chronicles 22:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद म्हणाला, “आपण परमेश्वरासाठी भव्य मंदिर उभारले पाहिजे. पण माझा मुलगा शलमोन अजून लहान आहे. त्याचे शिक्षणही अद्याप पुरे झालेले नाही. परमेश्वराचे मंदिर मात्र उत्कृष्ट झाले पाहिजे. असे देखणे आणि भव्य की सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याची कीर्ती व्हायला हवी. त्यदृष्टीनेच मी परमेश्वराच्या मंदिराची योजना आखीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी मंदिर उभारणीची बरीच तयारी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन तरुण व सुकुमार आहे, आणि जे मंदिर परमेश्वराप्रीत्यर्थ बांधायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशांत विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे.” ह्या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.