1 Chronicles 22:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात अनेक लोक मारले गेले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की, ‘तू बहुत रक्तपात केला आहेस आणि पुष्कळ युद्धे केली आहेत; तुला माझ्या नामाने मंदिर बांधायचे नाही, कारण तू माझ्यादेखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.