1 Chronicles 22:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मात्र तुझा मुलगा शांतताप्रिय आहे. मी त्याच्या कारकिर्दीत शांतता लाभू देईन. त्याचे शत्रू त्याला त्रास देणार नाहीत. त्याचे नाव शलमोन म्हणजे शांतताप्रिय असेल. इस्राएलला त्याच्या काळात शांतता आणि स्वस्थता लाभेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तुला एक पुत्र होईल तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा देईन; त्याचे नाव शलमोन (शांतताप्रिय) असे होईल; त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलास शांती व स्वस्थता देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.