1 Chronicles 23:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अम्रामचे पुत्र: अहरोन व मोशे. अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.