1 Chronicles 23:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची शिरगणती झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेवराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.