1 Chronicles 23:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या ह्यांत सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधीचे सर्व काम त्यांच्याकडे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेव्यांचा कार्यभाग, अहरोनाच्या वंशजांना याहवेहच्या मंदिराच्या सेवेत याप्रमाणे मदत करावी: अंगणाची देखरेख, इतर खोल्यांची देखरेख, सर्व पवित्र वस्तूंचे शुद्धीकरण आणि परमेश्वराच्या भवनातील इतर कामे करणे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.