1 Chronicles 23:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
4,000 द्वारपाल होतील आणि 4,000 देवांची स्तुतिगीते गातील. त्यांच्यासाठी मी खास वाद्ये करवून घेतली आहेत. त्यांच्या साथीवर ते देवाची स्तुती करतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.