1 Chronicles 24:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने एलाजाराच्या वंशांतला सादोक व इथामाराच्या वंशातला अहीमलेख ह्यांना त्यांची सेवेची कामे वाटून दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.