1 Chronicles 24:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खास कामगिरीकरता त्यांची निवड करण्यात आली. अहरोनचे वंशज असलेले त्यांचे याजक नातलग यांच्याप्रमाणेच चिठ्ठ्या टाकून ही निवड झाली. राजा दावीदा, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. कामाच्या नेमणुकीमध्ये घराण्यातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ बांधव असा भेदभाव नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.