1 Chronicles 24:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इथामारपेक्षा एलाजारच्या घराण्यात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या घराण्यात सोळा जण प्रमुख होते तर इथामारच्या घराण्यात आठ जण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरुष अधिक निपजले; त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली: एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातील पितृकुळांप्रमाणे आठ होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.