1 Chronicles 24:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दोन्ही घराण्यातील पुरुषांनी निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे दोन्ही घराण्यांतले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली; कारण पवित्रस्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार ह्या दोन्ही वंशांतल्या पुरुषांकडे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.