1 Chronicles 24:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमाया लेखनिक होता. हा नथनेलचा मुलगा. याचे घराणे लेवीचे होते सर्व वंशजांची नावे लिहिण्याचे काम शमायाने केले. राजा दावीद आणि इतर प्रमुख मंडळी-उदाहरणार्थ सादोक हा याजक, अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख-यांच्यासमोर त्याने या नोंदी केल्या. अहीमलेख हा अब्याथारचा मुलगा. दावेळी चिठ्ठ्या टाकून त्यातून एकाची निवड करण्यात येई. आणि शमाया त्या माणसाचे नाव लिहून ठेवी. अशाप्रकारे एलाजार आणि इथामार यांच्या कुळातील लोकांमध्ये कामाची वाटणी करण्यात आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक ह्याचा पुत्र शमाया ह्याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली; एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.