1 Chronicles 25:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद व सेनापती ह्यांनी आसाफ, हेमान व यदूथून ह्यांच्या वंशजांपैकी कित्येकांना वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. सेवेचे हे काम करणार्यांची संख्या येणेप्रमाणे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी: