1 Chronicles 25:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिराच्या सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत; आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.