1 Chronicles 26:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हशब्या हा हेब्रोन घराण्यातला. यार्देन नदीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या इस्राएलच्या भूमीवरील परमेश्वराचे कार्य आणि राज्याचा कारभार हशब्या आणि त्याचे भाऊबंद पाहात असत. या गटात 1,700 शूर वीर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेब्रोन्यांपैकी हशब्या व त्याचे भाऊबंद एक हजार सातशे हे वीर असून ते यार्देनेच्या पश्चिमेस परमेश्वराच्या सर्व सेवेसंबंधाने व राज्याच्या कामगिरीसंबंधाने इस्राएलावर देखरेख करणारे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेब्रोन्यांपैकी: हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.